उस्मानाबाद / प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा श्री संत सेना महाराज मंदिर संस्थान उस्मानाबाद या संस्थेचे संचालक व एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी शाहूराज दत्तोबा कावरे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई दत्तोबा कावरे राहणार तुळजापूर. हल्ली मुक्काम एसटी कॉलनी बार्शी नाका उस्मानाबाद यांचे वयाच्या 101 व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवार दि. 19 मार्च रोजी दुपारी (2 वा 23 मि.) निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना , नातवंडे ,नातसुना असा मोठा परिवार आहे .