तुळजापूर / प्रतिनिधी-

  तालुक्यातील बिजनवाडीचे सरपंच श्री.दत्तात्रय नागनाथ काळदाते, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष श्री.अमोल शित्रे यांनी भारतीय जनता पार्टीत  आपल्या शेकडो कार्यकत्यांसह भाजपामध्ये  प्रवेश केला.भाजपा आ. राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या हस्ते त्यांना भाजपात प्रवेश  देण्यात आला.

 या प्रवेशासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य  चित्तरंजन सरडे यांनी  विशेष प्रयत्न केले. या प्रवेशामुळे मंगरुळ  मतदार संघात भाजपाच्या ताकदीत वाढ होणार आहे. यावेळी श्री.रमेश पाटील, चिंचोलीचे सरपंच श्री.बालाजी बोराटे, श्री.सयाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.


 
Top