उस्मानाबाद (प्रतिनिधी) -  

बारा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करा,  दुखवट्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा संपूर्ण पगार देऊन निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे या मागणीचे  आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की,   92 हजार एसटी कर्मचाऱ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रातील एकूण 59 महामंडळापैकी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना  अतिशय अल्प वेतनामध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवन जगणे सुद्धा कठीण झाले आहे. या कारणास्तव त्यांना समान हक्क मिळण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शासनाने गरजेचे आहे. आतापर्यंत  118 कर्मचारी हे मयत झाले असून त्यापैकी अनेकांनी आत्महत्या केलेल्याआहे . सदरच्या आत्महत्या होण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. 

  या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अजित खोत, मुन्ना शेख, कमलाकर ठवरे, तानाजी पिंपळे, शहाजी पवार, आकाश कांबळे, उस्मान तांबोळी, माया जाधव, नामदेव वाघमारे, प्रेम कुमार वाघमारे, करण शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top