तुळजापूर / प्रतिनिधी-

 दाऊद इब्राहीमची बी टीम महाराष्ट्राच्या सरकार मध्ये काम करतेय म्हणून नवाब  मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, असा सनसनाटी आरोप आ. निलेश राणे यांनी सोमवारी श्री तुळजाभवानी मंदीरात देवीदर्शन घेतल्यानंतर पञकारांशी संवाद साधताना केला .

सोमवारी दुपारी १२ वाजता आ. निलेश राणे, मातोश्री निलम राणेसह सपत्नीक तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन करुन देवीची यथासांग पुजा करुन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी राम विलास छञे यांनी केले.

देविदर्शनानंतर बोलताना आ. निलेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेवर महाविकास आघाडीचे आलेले संकट दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ताकद व आशिर्वाद दे असे साकडे घातल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनेचे मराठवाडा विदर्भात सुरुवात होणाऱ्या शिवसंपर्क अभियान बाबतीत बोलताना म्हणाले की कीती ही अभियान सुरु करु देत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात भाजपाचा भगवा झेंडा फडकेल . धाराशीव संभाजीनगर नामांतरण हे महाराष्ट्रातील जनतेवर अवलंबून असल्याचे सांगुन ते उध्ववाच्या   नशीबी नाहीतर देवेंद्राच्या नशीबात असल्याचे यावेळी म्हणाले .मराठा समाजातील युवकांचा भावना मराठा आरक्षण बाबतीत बोथट झालाय असा आरोप मराठा तरुण करतायेत असा प्रश्न राणेंना विचारला असता चिडुन राणे म्हणाले की, कोणता युवक आरोप करतोय त्याला माझ्यासमोर आणा मी राणे आहे हे लक्षात घ्या मी त्याच्याशी बोलेन आपनाशी बोलणार नाही,असे यावेळी म्हणाले . आम्हाला महाराष्ट्रा महाविकास आघाडी सरकार पाडण्यात रस नाही ते पडले तर आम्ही पर्यायी सरकार देण्यास तयार असल्याचे यावेळी म्हणाले .

 यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसिलदार सौदागर  तांदळे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे, नगरसेवक सचिन पाटील,  विनोद गपाट,  विनोद गंगणे, महिला आघाडीच्या मिनाताई सोमाजी, आनंद कंदले, सुधीर पाटील, इंद्रजीत सांळुके, दिनेश बागल, राजेश्वर कदमसह भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते.

 
Top