तुळजापूर   / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना महिला आघाडी तुळजापूर ने आयोजित केलेल्या महिला सन्मान सोहळ्यात तुळजापूर तालुक्यातील शिक्षण, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला भगिनींचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, पंचायत समिती तुळजापूर सभापती रेणूकाताई इंगोले, तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा शनिवार दि.12 रोजी तुळजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला.

 या सन्मान सोहळ्यात पी.एच. डी. प्राप्त श्रीम. डोलारे रंजना, तसेच पी.एच.डी. साठी निवड झालेल्या श्रीम. दुधगी सीमा ,श्रीम जयमाला वटणे यांचा सन्मान करण्यात आला, याच कार्यक्रमात कोविड काळात उत्कृष्ट योगदान दिलेल्या अधिपरिचारिका सौ. शोभा केवटे, तसेच ए.एन.एम श्रीम.अंधारे मॅडम, श्रीम. भालेराव मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला .संघटनात्मक कार्यात योगदान दिल्याबद्दल कळंब तालुका  महिला आघाडी प्रमुख श्रीम. मुक्ता ढासाळकर, उस्मानाबाद तालुका महिला आघाडी प्रमुख श्रीम.धुमाळ मॅडम, साहित्यिका श्रीम. मनीषा क्षीरसागर, श्रीम. शेख मॅडम यांचा तसेच शिक्षण क्षेत्रात उत्तम योगदान देत असल्याबद्दल श्रीम. तांबे संकल्पना,  श्रीम. कानडे स्वाती, श्रीम. जोगदंड अश्विनी, श्रीम.सुषमा सांगळे, श्रीम. शुभदा कुलकर्णी, श्रीम. सरिता चुंगे, श्रीम. श्रीदेवी कोळसुरे, श्रीम. नंदा सूर्यवंशी, श्रीम. उषा मुरमुरे, श्रीम. रेखा शिंदे, श्रीम. वंदना वाघमारे, श्रीम. भरती तुपेरे, श्रीम.अश्विनी काळदाते यांचा व क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून उत्तम कार्य करणाऱ्या श्रीम. कांता राऊतगोळ यांचा ही सन्मान करण्यात आला.

  कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीम. सीमा दुधगी, श्रीम.संकल्पना तांबे, श्रीम. जयमाला वटणे, श्रीम. स्वाती कानडे, श्रीम. नंदा सूर्यवंशी, श्रीम. दिपाली शिंदे ,श्रीम रेखा शिंदे यांनी परिश्रम घेतले. तुळजापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. शामल सगर यांनी तर आभार श्रीम.सीमा दुधगी यांनी मानले.

 
Top