लोहारा /प्रतिनिधी

लोहारा शहरातील चाऊस मैदानावर शिवनेरी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन यांच्यावतीने करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळा चाऊस मैदानाव घेण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते अभिमान खराडे होते तर प्रमुख म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सचिन जाधव उमरगा, उपनगराध्यक्ष आयुब शेख लोहारा, युवा सेना माजी तालुका प्रमुख योगेश तपसाळे उमरगा, गोपाळ जाधव, ओम जगताप, नगरसेवक अविनाश माळी, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, ओम कोरे, नगरसेवक अमिन सुंबेकर, आयोजक अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, दिपक रोडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, युवा सेना जिल्हा उप प्रमुख नामदेव लोभे, सरपंच सागर पाटील, बाळासाहेब लोभे, जगदिश लांडगे, सरपंच परवेज तांबोळी, नितीन जाधव, दत्ता मोरे, ओम पाटील, आदि, उपस्थित होते.

 या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये युवा नेते किरण गायकवाड, द्वितीय पारितोषिक 25 हजार रुपये युवा नेते अभिमान खराडे, तृतीय पारितोषिक 15 हजार रुपये नगरसेवक अमिन सुंबेकर, चौथे पारितोषिक 7 हजार रुपये दयानंद स्वामी व सचिन गोरे, व चषक ओम कोरे यांच्यावतीने देण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक योगिराज क्रिकेट संघ जेवळी, द्वितीय क्रमांक बंडखोर क्रिकेट संघ रेबे चिंचोळी, तृतीय क्रमांक मोमिडियन क्रिकेट संघ औसा, चौथा क्रमांक wcc क्रिकेट क्लब या संघांनी पटकाविला. अंतिम सामन्याचे पंच म्हणून तबरेज सय्यद, अन्सार पठाण यांनी काम पाहिले. यावेळी विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव गोरे यांनी केले तर आभार आयोजक नगरसेवक गौस मोमिन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाघमारे, परमेश्वर कोकणे, खुनमिर मोमिन, सय्यद चाऊस, सुजित पोतदार, हसन मोमिन, शायर मोमिन, मोहसीन मोमिन, बाबा मोमिन, अहेमद मोमिन, मैनु मोमिन, मोहिन सय्यद, हांजीलाल मोमिन, सादिक मोमिन, महिदी मोमिन, अमजद मोमिन आदींनी परिश्रम घेतले.

 
Top