तेर/  प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात १२ ते १४ या वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तेर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली .                                       

यावेळी या लसीकरण मोहीमेचा नायब तहसीलदार श्रीमती कदम , मुख्याध्यापक एस .एस .बळवंतराव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी १२ ते १४ वयोगटातील १८३ विद्यार्थी व  विद्यार्थिनींना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला .यावेळी लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एस. एस .बळवंतराव , डी. डी. राऊत , अतुल राठोड , हरी खोटे , एस. यु .गोडगे , ए. बी. वाघेरे , ए .बी. नितळीकर , सतिश भालेराव ,   तेर ग्रामीण

रुग्णालयातील परिचारिका सुरेखा पाटील , एस. एस. ठावरे , ए .पी. धावारे , मंगेश वाघमारे , विनोद गायकवाड , शुभम वैरागे ,आदिनी परिश्रम घेतले. 

 
Top