उस्मानाबाद / प्रतिनिधी 

दिनांक ०३ मार्च २०२१ रोजी एन एच ५२ हायवे रोडवर सुरतगाव ते शांकभरी हॉटेल समोर एका अनोळखी व्यक्तीसं वाहनांने धडक देवून निघून गेला. या धडकेत ही अनोळखी व्यक्ती हा मृत्यू पावला आहे. त्यावरून पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पर्यंत त्या व्यक्तीची ओळख पटली नाही.त्याचे अंदाजित  वय अंदाजे ४० वर्षे असेल. मयताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग- सावळा, उंची-१७० सेंमी, केस- काळे पांढरे, कपडे- लाल निळया रंगा चौकाडा शर्ट आणि निळी जिन्स पॅन्ट, शरीर बांधा’ सडपातळ असे आहे.

या अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत उपयुक्त माहिती प्राप्त झाल्यास पोलीस स्टेशन तामलवाडीस कळवावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.


 
Top