तेर /  प्रतिनिधी

पर्यटन उपसंचालक कार्यालय औरंगाबाद व जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तेर येथे आयोजित पर्यटन महोत्सवास  हेरीटेज वाॅकने प्रारंभ आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आयोजित पर्यटन महोत्सवास 27 मार्चला आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  हेरीटेज वाॅकने करण्यात आला.कै.रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयापासूंन चैत्य गृह,श्री संत गोरोबा काका मंदिर,कालेश्वर मंदिर,तिर्थकुंड,उत्तरेच्या मंदिर, त्रिविक्रम मंदिर,श्री.संत गोरोबा काका यांचे निवासस्थान, संग्रहालय असा  हेरीटेज वाॅक करण्यात आला.यावेळी जिल्हा परीषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी सुरेश तायडे, पर्यटन विभागाचे सहसंचालक विजय जाधव,मंडल अधिकारी अनिल तीर्थकर, तलाठी प्रशांत देशमुख, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी,तगर अभ्यासक रेवणसिद्धप्पा लामतुरे,ह.भ.प.दिपक महाराज खरात, सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे, सरपंच नवनाथ नाईकवाडी, पोलिस पाटील फातेमा मनियार, पद्माकर फंड, नवनाथ पांचाळ, साहेबराव सौदागर, विजयसिंह फंड, लतिका पेठे, जोशीला लोमटे,मिरा जाधव आदी उपस्थित होते.


 
Top