उस्मानाबाद -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत येरमाळा इलेव्हन संघाने अंतिम सामन्यात सागर इलेव्हन संघावर मात करुन ‘साहेब चषक’ पटकावला. तर सागर इलेव्हन संघ उपविजेता ठरला. शनिवारी (दि.26) सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते चषक व बक्षीस रक्कम देऊन विजेत्या संघाला सन्मानित करण्यात आले.उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमवर दि. 23 मार्चपासून सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. बाद पद्धतीने खेळविल्या गेलेल्या या स्पर्धेसाठी संघासह खेळाडूंना मोठ्या रकमेची वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली होती. स्पर्धेत येरमाळा इलेव्हन आणि सागर इलेव्हन या संघामध्ये चुरशीचा  सामना रंगला. यात येरमाळा इलेव्हन संघाने बाजी मारुन साहेब चषक पटकावला. अंतिम सामन्यानंतर शनिवारी सायंकाळी विजेत्या संघासह उपविजेते संघ व खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  विजेत्या येरमाळा संघाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर यांच्या वतीने 51 हजार रुपये व चषक, उपविजेत्या सागर इलेव्हन संघाला डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने 31 हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्या वतीने 21 हजार रुपये व चषक बाबा इलेव्हन संघ, तर चौथे पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते मृत्यूंजय माणिक बनसोडे यांच्या वतीने 11 हजार रुपये व चषक शबनम इलेव्हन संघाला देण्यात आले. तसेच माजी नगरसेवक बाबा मुजावर यांच्या वतीने मॅन ऑफ द सीरिज 5 हजार रुपयाचे बक्षीस सागर इलेव्हन संघाचा ऋषीकेश आदटराव यास देण्यात आले. अनिकेत पाटील यांच्या वतीने मॅन ऑफ मॅच फायनल 2 हजार रुपयाचे बक्षीस ओंकार काळे, माजी नगरसेवक बाबा इस्माईल यांच्या वतीने बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज 2 हजार रुपये सचिन काळे, तर जयंत देशमुख यांच्या वतीने बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज 2 हजार रुपयाचे बक्षीस सोमनाथ बारकुल याने पटकावले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष असद पठाण, कादर खान, माजी नगरसेवक प्रदीप घोणे, बाबा मुजावर, बाबा इस्माईल, मृत्यूंजय बनसोडे, शहराध्यक्ष आयाज शेख, अनिकेत पाटील, राजकुमार पवार, युवक नेते रणवीर इंगळे, शेखर घोडके, बिलाल तांबोळी, विधिज्ञ विभागाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. योगेश सोन्ने-पाटील, मिनिल काकडे,  नवनाथ डांगे, प्रशिक्षक सूर्यवंशी, सईद काझी, ए.बी. 17 क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अक्षय बावस्कर यांच्यासह खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. 
 
Top