उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या 19 वर्षाच्या खालील विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघातून व उस्मानाबादच्या मातीमध्ये घडलेल्या राजवर्धन हंगरगेकर याचा अभिमान असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सत्कारादरम्याण गौरव उद्गार काढले.

उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागातून क्रिकेटची सुरुवात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर उस्मानाबाद जिल्ह्यास प्रसिध्दी देण्यात राजवर्धनचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव असताना व कोरोनाच्या संकटकाळात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 19 वर्षाच्या खालील वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या खेळामधील कौशल्य दाखवून उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडू इतर खेळाडूंच्या तुलनेमध्ये सरस असल्याचे सिध्द केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडूंना राजवर्धनची कामगिरी सातत्याने प्रेरणा व स्फूर्ती ठरेल. राजवर्धनचे हे यश निश्चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. त्याने 19 वर्षाच्या खालील विश्वचषक स्पर्धेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दि. 28/02/2022 रोजी पूणे येथील राजवर्धन हंगरगेकर यांच्या निवासस्थानी जावून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सत्कार केला.

यापुढेही असेच आंतरराष्ट्रीय क्रिक्रेट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन देशाच्या विजयासाठी मोलाचे योगदान द्याल याचा सार्थ विश्वास असल्याच्या भावना व्यक्त केल्या तसेच राजवर्धच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजवर्धन यांचा परिवार, श्री. उदयसिंह पाटील, श्री. रामेश्वर दौंड उपस्थित होते. 

 
Top