उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top