तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पर्यटन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, नारीशक्ती पुरस्कार प्राप्त कमल कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी खरमटे, तहसीलदार गणेश माळी,तगर अभ्यासक रेवणसिद्धप्पा लामतुरे,ह.भ.प. दिपक महाराज खरात,तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी , पर्यटन विभागाचे उपसंचालक  डॉ श्रीकांत हारकर यांच्या हस्ते करण्यात आले.                                      

यावेळी तेर येथील वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे बालवारक-यानी मृदंग वादन व संगीत भजन सादरीकरण केले.तर औरंगाबाद येथील सारीका कुलकर्णी, अपर्णा डबीर, केदार देशमुख यांचा स्वरलहरी मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा तर श्रीकांत शिंदे ,केमवाडी व समाधान निचळ ,तुळजापूर यांचा शास्त्रीय सुगम संगीत कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रास्ताविक ह.भ.प.दिपक महाराज खरात यांनी केले.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील प्रथम अलिना मोमीन, व्दितीय समृद्धी मोरे ,तृतीय तेजश्री भोरे,  उत्तेजनार्थ प्रतिक्षा सूर्यवंशी, संचिता नाईकवाडी,सानिका पाडूळे,समिक्षा आंधळे,समर्थ कुलकर्णी या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अभार दिपक महाराज खरात यांनी मानले.

यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील, शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, ह.भ.प . रघुनंदन महाराज पुजारी, मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, पोलिस पाटील फातेमा मनियार, बाळासाहेब वाघ,  जूनेद मोमीन, सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे,हरी खोटे,सागर ढोणे, विकास भोरे, विजय कानडे, विलास पांढरे, नवनाथ पांचाळ, बालाजी भक्ते, मज्जित मनियार, प्रभावती लामतुरे, जोशीला लोमटे , लतिका पेठे व श्रोते उपस्थित होते.कार्यक्रमासाठी पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ श्रीकांत हारकर, सहाय्यक उपसंचालक विजय जाधव व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


 
Top