मुरुम (प्रतिनिधी) : 

तरुणांच्या बाहय व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास हा अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरामध्ये सहभागी झालेल्या शिबीरांमधून होतो. अशी शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे असल्याचे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोविंद पाटील यांनी केले.

 गणेशनगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने   ‘ ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व आरोग्य संवर्धनासाठी युवा वार्षिक शिबीर ‘ प्रसंगी बुधवार (ता. ३०) रोजी शिबीराच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरूजी होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप, सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच सतिश पवार, प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत विराजदार, मुख्याध्यापक सुभाष राठोड, उपसरपंच, तंटामुकत समितीचे अध्यक्ष माणिक राठोड, पोलीस पाटील कलावती चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संध्या डांगे, एनएसएसचे विद्यार्थी प्रतिनिधी योगेश पांचाळ, अमितकुमार बनसोडे, लता कांबळे, अंजली स्वामी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.               

 यावेळी रंगनाथ जगताप, अमोल कटके व भाग्यश्री पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट सहभागाबद्ल सोनाली चव्हाण, दिक्षीवंत जाधव, शितल कटके, सोनू चव्हाण, सोनाली जाधव, श्वेताराणी कसनकर, नामदेव शिंदे, यशोदा बोडरे, आकाश पांचाळ, पुजा शिंदे, प्राजक्ता थोरात, सतिश महिंद्रकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. लखन पवार, प्रा. सचिन राजमाने, प्रा. अशोक बावगे, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. सुशील मठपती, प्रा. भूषण पाताळे, श्रावण कोकणे, प्रभाकर महिंद्रकर, दत्ता कुंभार आदींनी पुढाकार घेतला. शिबीराचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवि आळंगे यांनी केले. प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी आभार मानले.


 
Top