उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर सुमारे २६ हजार हेक्टर ऊस शिल्लक असून गावनिहाय ऊस तोडणीचे नियोजनासाठी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली होती.

साखर आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिल्लक ऊसाच्या तोडणीचे गावनिहाय नियोजनासाठी सोमवारी दुपारी १२ वाजता विभागीय सहसंचालक (साखर) यांनी सोलापूर येथे साखर व गुळ पावडर कारखानदारांसोबत बैठक आयोजित केली आहे. बैठकीस शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ. राणा पाटील यांनी केले. उस्मानाबाद, कळंब व परंडा तालुक्यात ऊस शिल्लक असल्याने शेतकरी तणावात आहेत. विषयाच्या गांभीर्याबाबत साखर आयुक्तांशी केलेल्या चर्चेअंती जिल्ह्यात ऊस तोडणीचे गावनिहाय नियोजन करण्यासाठी बैठक घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व विभागीय सहसंचालक (साखर) यांना देण्यात आल्या होत्या.


 
Top