उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्‍ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर परिसर तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बाल भिक्षेकरी कचरा गोळा करणारी अल्पवयीन मुलं मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला आदेश दिले असून सुद्धा याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने विशेष बाल सहाय्यक पोलीस पथकाचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार बोंदर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसले आहेत.

 जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की शासनाने मुलांना सक्तीचे शिक्षण घोषित केले आहे परंतु महिला व बालकल्याण विभाग कामगार विभाग आणि शिक्षण विभागाकडून याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करताना दिसून येत आहे तरी शिक्षण बाह्य अल्पवयीन भिक्षेकरी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महिला व बालकल्याण शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन सुद्धा त्याची दखल घेण्यात आलेली नाही याच मागण्याचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत असून यापुढेही प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बोंदर यांनी निवेदनातून दिला आहे

   या लाक्षणिक उपोषण भारतीय जनता युवा मोर्चा,आधुनिक लहुजी सेना,बाराबलुतेदार अल्पसंख्यांक बहुजन कामगार संघ,शेतकरी संघर्ष समिती,आमदार संवाद मंच,उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन उस्मानाबाद,राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी,बळीराजा पार्टी,श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी पाठिंबा दिला आहे.

 
Top