उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व भाजपा युवा सरचिटणीस राज ‍निकम यांच्या वाढदिवसा निमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन बुधवार दि.०९ मार्च २०२२ रोजी, गणेश नगर उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. राज निकम यांच्या वाढदिवसा निमीत्त हार,तुरे, डिजे यांना फाटा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. या आरोग्य शिबीरात उस्मानाबाद शहरातील सर्व वयोगटातील ४३० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे सुनिल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, प्रदिप शिंदे, अभय इंगळे, इंद्रजीत देवकते, राहुल काकडे, प्रचार्य डॉ. व्ही.व्ही.माने, डॉ.डी.डी.दाते, डॉ.उषा वडणे, महेश पवार, प्रा.अविनाश निकम, प्रदिप जगताप, श्रीनिवास शेरकर, चेतन इंगळे, वैभव शेंडगे, अनिल सावंत, सतिष जाधवर, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, हिम्मत जगताप, सुजित साळेके, स्वानंद पाटील, सागर पवार, आकाश शेळके, किशोर पवार, आकाश छबीले, सतिष कांबळे व ईतर पदधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अमानुल्ला मर्चंट, डॉ.शाईस्ता खान, डॉ.कायती मेघनानी, डॉ.मानसी कुर्ले, डॉ.कृतीका पारतकर, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, ईत्यादींनी परीश्रम घेतले.

 
Top