उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 एकंबी वाडी येथील ऋषिकेश सोमनाथ लांडगे याचा एमबीबीएस ला प्रवेश निश्चित झाला आहे. त्याबद्दल एकंबी वाडी ग्रामस्थांच्यावतीने ऋषिकेश सोमनाथ लांडगे याचा औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व औसा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष श्रीकांत सूर्यवंशी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अभिमन्यू पवार यांनी ऋषिकेश लांडगे यांनी कुठेही क्लासेस न लावता स्वतः तयारी करून कठीण परिस्थितीमध्ये मिळवलेल्या या यशाचे कौतुक केले. तसेच ऋषिकेश ला मिळालेले हे यश त्याच्या आई-वडिलांच्या कष्टामुळेच मिळालेले आहे. कठीण परिस्थितीत हतबल न होता नियोजन पुर्वक प्रयत्न केल्यास यश मिळते असे सांगीतले. आज या ठिकाणी ऋषिकेशचा होत असलेला सत्कार याचा आदर्श गावातील विद्यार्थ्यांनी घ्यावा व त्यांच्या आईवडिलांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन मुले घडवण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले. तसेच ऋषिकेशला प्राथमिक शाळेत शिकवलेल्या हजारे सरांचे ही कौतुक केले. अध्यक्ष म्हणून संबोधित करत असताना श्रीकांत भैय्या सूर्यवंशी यांनी सरपंच जीवन चव्हाण यांनी या कार्यक्रमाचा योग घडवून आणला ऋषिकेश सोबत इतर मुलांना सुद्धा हे प्रोत्साहनाचा क्षण मिळवून दिला. त्याबद्दल सरपंचाचे कौतुक केले तसेच हे ऋषिकेशचे यश एकंबी वाडी नाहीतर परिसरातील हे पहिले एमबीबीएस आहे. हे यापुढे असेच एमबीबीएस ला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सरपंच जीवन चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच ऋषिकेश लांडगे यांनी सुद्धा सत्काराला उत्तर देत असताना केलेल्या सत्कार बद्दल आभार म्हणून भविष्यात ज्या वेळेस वैद्यकीय क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिसला सुरुवात करीन त्यावेळेस औसाचे आरब डॉक्टर साहेब हे ज्या पद्धतीने नागरसोगा गावांना मोफत उपचार देतात त्या पद्धतीने भविष्यात मीसुद्धा जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस सुरू करीन तेव्हा गावाला मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करीन असे बोलून दाखवले. ऋषिकेशचे वडील प्रा. सोमनाथ लांडगे यांनीसुद्धा कठीण काळामध्ये ज्या पद्धतीने ऋषिकेशने प्रयत्न केले त्या प्रसंगाचे वर्णन केले. संपूर्ण कुटुंब कोविड पॉझिटिव्ह असतानासुद्धा या काळामध्ये त्यांनी मिळवलेले यश हे  वाखाणण्यासारखे आहे असे प्रतिपादन केले. हा संघर्षाचा वारसा माझ्या वडिलांकडून ऋषिकेशने घेतला आहे असे सांगीतले. एक अशिक्षित कुटुंब ते डॉक्टर हा मोठा प्रवास असल्याचे सांगीतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व तरुण कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले. यावेळी  बाबाराव चव्हाण, भालचंद्र चव्हाण, शिवाजी चव्हाण, शिवाजी सगर, दामोदर सर, माणिक लांडगे, बिरूदेव लांडगे, बळीराम सगर, माणिक चव्हाण, भारत चव्हाण जि. प. शाळेतील विद्यार्थी व गावातील सर्व नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top