उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री संत तुकाराम महाराज मंदिर,गोशाळा व वारकरी शिक्षण संस्था आळणी ढोकी रोड लगत या संस्थेत तुकाराम बीज निमित्त सुरू असलेल्या अखंड हरीना सप्ताहाच्या आजच्या तुकारम बीजनिमित्त ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे सोलापुरकर यांचे गुलालाचे किर्तन झाले.त्यांनी तुकाराम महाराजांच्या बीजे निमित्त सुरू झालेली आळंदी ते पंढरपुर वारीत नारायण महाराज यांनी सुरू केली “ज्ञानोबा तुकाराम” भजनाची अख्याईका सांगीतली.

पुढची पिढी जोप्रयंत वारकरी सांप्रदायात उतरतील तेव्हाच सांप्रदाय पुढे जाईल.प्रत्येकाच्या घराघरात वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेतलेच पाहिजे तर आपली पिढी सुस्कांरीत निघेल.तुकारामाचे नाम घेता कापे यम तुकारामाच्या नामातच येवढं महत्व आहे.सामाजिक वारकरी क्षेत्रात संत साहित्याची गरज आहे,तळागाळाप्रयंत तुकाराम महाराजांचे विचार संत साहित्य पोहचले तर नक्कीच दिशादर्शक ठरू शकेल.समाजात चांगले विचार निर्माण होतील.या सोहळ्यास ह.भ.प.महादेव महाराज तांबे आळणीकर,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे,ह.भ.प.गोविंद महाराज येडशीकर,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,ह.भ.प.बाळासाहेब महाराज वीर,ह.भ.प.लक्ष्मण महाराज चौगुले,उमाकांत आग्रे,गणेश महाराज यलकर,डॉ जयसिंग वीर,धनंजय कापसे,विनोद महाज वीर ,भजनदास धोंगडे,शाम लावंड यांच्यासह पंचक्रोशीतील येडशी,खेड,खामगाव,कुमाळवाडी,शिंगोली,जवळा परीसरातील महाराज मंडळी व भक्तगण मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


 
Top