उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यातील असंख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत म.वि.आ. सरकार मधील मंत्री मलीक यांना दहशतवादी गुन्हयातील बेकायदेशार जमीन खरेदीतच रस. मग कसा होईल महाराष्ट्राचा विकास ! असा खोचक सवाल करत मविआ सरकार च्या राज्य प्रणालीवर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी ताशेरे ओढले .

राज्याच्या अल्पसंख्यक खात्याचे मंत्री श्री नवाब मलिक यांच्या वरील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईनंतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष केंद्राकडून जाणीवपूर्वक कारवाई झाल्याचा कांगावा करत आहेत. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पीकविमा, अनुदान, कर्जमाफी, सक्तीची वीजबिल वसुली, या विषयावर ब्र न काढणारे कोविड काळात सर्वसामान्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढे न येणारे परंतु वाईन ही दारु नाही सांगत किराणा दुकानात वाईन उपलब्ध करून देणारे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टीच्या नेत्यांकडून  जनतेने अपेक्षा तरी काय ठेवाव्यात. असे नितीन काळे यांनी म्हंटले आहे.

 
Top