परंडा / प्रतिनिधी:-
परंडा तालुक्या अतंर्गत २९ तलाठी सज्जे अस्तित्वात असुन तलाठी सज्जा पुनर्रचना शासन राजपत्र दिनांक २५ / १० / २०१७ अन्वये तलाठी सज्जाची अंतिम अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये नवीन १२ तलाठी सज्जाची निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये .आवरपिंपरी, बावची, भोत्रा,सरणवाडी, राजुरी, रोहकल, साकत(बु ), मुगांव, काटेवाडी, चिंचपुर ( खु ), पांढरेवाडी, कुक्कडगांव अशा नवीन तलाठी सज्जा निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये आवारपिंपरी सज्जामध्ये आवारपिंपरी, पिठापुरी, करंजा, बावची सज्जा मध्ये बावची, रूई, दुधी, भोत्रा सज्जामध्ये भोत्रा, जामगांव,रोसा,सरणवाडी सज्जामध्ये सरणवाडी, ढगापिंपरी, ब्रम्हगांव, राजुरी सज्जामध्ये राजुरी, वाडीराजुरी, टाकळी, रोहकल सज्जामध्ये रोहकल पिस्तमवाडी, साकत (.बु ) सज्जामध्ये साकत( बु ) ,साकत( खु ) मुगांव सज्जामध्ये मुगांव, पारेवाडी, कार्ला,काटेवाडी सज्जामध्ये काटेवाडी,जगदाळवाडी, धोत्री, चिंचपुर( खु ) सज्जामध्ये चिंचपुर( खु ), उंडेगांव, पांढरेवाडी सज्जामध्ये, पांढरेवाडी, जेकटेवाडी, ताकमोडवाडी आदीं गावाचा समावेश करण्यात आला आहे तसेच सातबारा आणि आठ अ हे दोन उतारे जमिनी संबंधित खूप महत्वाचे दस्तऐवज मानले जातात. तसेच जमिनी संबंधित असणारे महत्त्वाचे दस्तऐवजा संबंधित कामे करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी हे दोन शासकीय कर्मचारी कार्यरत असतात. आणि
तलाठी यांच्या कार्यक्षेत्राला अथवा कार्यलय म्हणजे सज्जा असे म्हटले जाते. तसेच परंडा तालुक्या मध्ये अगोदर २९ सज्जे होते, पुनर्रचना करून नवीन १२ सज्जा ची निर्मिती करण्यात आली आहे तालुक्यात आता एकूण ४० सज्जे तयार झाले आहेत.सोबतच तालुक्यात एकण ५ मंडळ होते आता नविन पुनर्रचना करून २ नवीन महसुल मंडळ निर्माण केले आहेत. त्यापैकी शेळगाव आणि पाचपिंपळा या महसुल मंडळाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे.
परंडा तालुक्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ यांच्या पुनर्रचनेतून नव्याने निर्माण झालेल्या तलाठी सज्जा आणि मंडळ या मुळे नागरिकांना याचा खूप फायदा होण्यास मदत होईल असे शेतकऱ्यांमधुन बोलले जात आहे. तसेच नवीन तलाठी सज्जाचे महसुली कामकाज कधी चालु होणार अशी प्रतिक्षा जमीन खातेदार करत आहेत.