परंडा / प्रतिनिधी-

  परांडा तालुक्यातील घारगाव येथील जि प प्रा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त व शैक्षणिक परिषद चे औचित्य साधून अस्ट्रॉनॉमी क्लब चे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी  अनिता जगदाळे-सुलतानपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा वर्षा लटके या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख चंद्रकांत बेळे,सरपंच राणी काळे, रेखा वाघमारे ,दिनकर साबळे, प्रदीप खराडे हे होते

 विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात खगोलशास्त्र विषयाची ओळख व आवड निर्माण व्हावी, खगोलशास्त्रातील विविध संकल्पनांचे आकलन व्हावे,विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टी, सर्जनशील विचार, सहकार्य ,गटकार्य, इतरांचा आदर ,निरीक्षणशक्ती इ. एकविसाव्या शतकातील कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये  विकसित व्हावेत ,अवकाश व भविष्यातील संधी विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात या हेतूने खगोलशास्त्र क्लब चे महत्व शालेय जीवनात  खूप महत्त्वाचे आहे.ग्रहणासारख्या घटनेला अशुभ न मानता त्यामागील वैज्ञानिक कारण विद्यार्थ्यांना समजावे, अवकाशात घडणाऱ्या घटनां केवळ खगोलीय घटना आहेत त्याचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नाही हा वैज्ञानिक दृष्टिकोन भविष्यातील नागरिकांमध्ये विकसित होण्याचे महत्वाचे उद्दिष्टे या क्लबच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

 खगोलशास्त्र क्लबमध्ये खगोलशास्त्र विषयक पोस्टर्स ( सूर्यमाला, चंद्र,पृथ्वी,निवडक उपग्रह, मंगळयान,चंद्रयान ,तारकासुमूह,आकाशगंगा ,तेजोमेघ (नेब्युला),अंतराळवीर ,प्रमुख दुर्बीण इत्यादी उपलब्ध करण्यात आले आहेत.

खगोलशास्त्र क्लब अंतर्गत घेण्याचे उपक्रम - 

 भुगोल दिन 14 जानेवारी ,22 मार्च संपात दिन ( वसंत संपात दिन ) ,23 सप्टेंबर संपात ( शरद संपात दिन) 21 जून ( सर्वात मोठा दिवस ) ,22 डिसेंबर ( सर्वात मोठी रात्र ) खग्रास ,खंडग्रास ,कंकणाकृती चंद्रग्रहण व सूर्यग्रहण , जागतिक खगोल महिना ( एप्रिल ) सुपर मुन ,शून्य सावली दिन ,पिधान इत्यादी उपक्रम त्याचबरोबर इतर प्रासंगिक महत्वपूर्ण खगोलीय घटनांची माहिती या क्लबच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना तसेच पालकांना ,गावातील नागरिकांना सोप्या पद्धतीने स्पष्ट करू शकतो.या क्लबच्या माध्यमातून गटकार्य करण्याची संधी विद्यार्थ्यांना  देता येईल जसे की ,सूर्य निरीक्षण ( उत्तरायण ,दक्षिणायन) यासारख्या उपक्रमातून विद्यार्थी गटकार्य करतील व आपल्या मित्रांसोबत नवीन गोष्टी अगदी आनंदात शिकतील अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण  उपक्रम खगोलशास्त्र क्लबच्या माध्यमातून शाळांमध्ये राबवले जातील. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश इनामदार यांनी केले तर आभारप्रदर्शन उदारकर्ण पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सतिश गुरव, नारायण इंगळे, सिकंदर तांबोळी, हनुमंत मुंढे ,वैशाली कुलकर्णी, गोविंद मोहिरे यांनी परिश्रम घेतले.

 

 “ खगोलशास्त्र हा विषय भविष्याचा वेध घेणारा विषय आहे आणि याच विषयासोबत विद्यार्थ्यांची बालवयातच मैत्री घडून येणे ही एक मोठी सकारात्मक गोष्ट आहे . विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी विकसित होणे ही  काळाची गरजअस्ट्रॉनॉमी क्लब च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे”.

 -राहुल अंधारे (प्रा शिक्षक)

 
Top