तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीलंका  येथे 23सप्टेबर  2017र पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्युपिल्स ऑलिंपिक स्पर्धेत कराटे मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूचा पराभव करून भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या रामतीर्थ ता . तुळजापूर येथील प्रणिता मोहन पवार या विद्यार्थीनी वर आज उपासमारीची वेळ आली आहे . या खेळााडूस मनसेच्या मदत देण्यात आली. सदर खेळाडूस राज ठाकरे यांनी मुंबई येथे भेट घेण्यासाठी बोलावले आहे. 

      प्रणिता हिचे वडील रिक्षा चालवुन कुदुंबियांना सांभाळत होते व चरितार्थ चालवित होते . परंतु नियतीसमोर कुणाचेच काही चालत नाही असे बोलले जाते . अगदी तसेच झाले आणि प्रणिताच्या वडीलांचे गेल्यावर्षी कोरोनामुळे निधन झाले . वडीलांच्या अचानक जाण्याने प्रणिताच्या कुटुंबाची स्थिती हालाखीची बनली कारण घरातील कर्ताच गेल्याने कुदुंबावर उपासमारीची वेळ आली . प्रणिताची दुसरी बहिण इ. १२वी व लहान भाऊ इ ७वी मध्ये शिक्षण घेत आहे. प्रणिता १०वीत आहे. अशा कठिण परिस्थितीत स्वतःची शेतजमिन व उत्पनाचे दुसरे काहीच साधन नसल्याने प्रणिताच्या आईला दुसयाच्या शेतात मजुरीने कामाला जावुन कुटुंबाचा उदरनिर्वाह अत्यंत काटकसरीत भागवावा लागत आहे. ही बाब समजताच मनसेच्या पदाधिकारी  यांनी तातडीने  प्रणिता व तिच्या कुटुंबियांची घरी जावून भेट घेतली . सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर मनसेच्या वतीने किराणा साहित्य, कपडे, शैक्षाणिक व इतर आवश्यक साहित्य रोख रकमेसह प्रणिताच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले .  प्रणिताच्या यापुढील शिक्षणाची व इतर आवश्यक संपूर्ण खर्चाची जबाबदारी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी घेतली . 

मनसेने संपुर्ण घटनेची सविस्तर माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी सारिका काळे यांना फोनवरून दिल्यानंतर त्यांनीही उद्याच प्रणिताची तिच्या घरी भेट घेऊन सर्वोतोपरी सहकार्य करून सर्व शासकिय मदत मिळवून देऊ असे सांगितले . प्रणिताला राजठाकरे यांनी मुंबईला भेटायला बोलवले आहे.


 
Top