उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील संशयित क्षयरोग रुग्णांची लवकर थुंकी तपासणीद्वारे निदान होण्यासाठी सध्यस्थितीत कार्यान्वित १९ टीबी डायग्नॉस्टिक सेंटर उपलब्ध आहेत. यात आणखी सात सेंटरची भर घालण्यात येणार आहे. तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालय येथे सीबीएनएएटी मशीन पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळाचे नियोजन जिल्हा स्तरावरून करण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

निमित्त होते गुरुवारी जागतिक क्षयरोग दिनाचे. या दिनानिमित्त शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डी. के. पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलकुडे, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सचिन देशमुख, डॉ. पांचाळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ रफिक अन्सारी, अधिसेविका जयश्री जाधव, उपप्राचार्य सुनीता पोखरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. होळे, डॉ. बेटकर जिल्हा क्षयरोग कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रारंभी गुप्ता आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

 
Top