उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सुधारित वेतननिश्चिती फरक बिलाच्या धनादेशावर वरिष्ठांची सही करून घेण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारताना भूमच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यिकेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई सोमवार दि. १४ मार्चच्या सायंकाळी करण्यात आली. 

तक्रारदाराचे वडील मैल कामगार म्हणून २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर २०२१ मध्ये त्यांची सुधारित वेतननिश्चितीबाबत आदेश काढले होते. फरक रक्कम बिलाच्या ९१ हजार २५७ बिलाच्या धनादेशावर वरिष्ठांच्या सहीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या भूम उपविभागातील कनिष्ठ सहाय्यिका राजश्री उत्तम शिंदे (४०) यांनी लाच मागितली. संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागाने भूम येथील कार्यालयात सापळा लावला. शिंदे यांनी तक्रारदराकडे १५०० रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून स्वीकारली. तेव्हा पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. एसीबीचे पोलिस उपाधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिकारी दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके यांनी ही कारवाई केली.


 
Top