तेर / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या कुस्ती स्पर्धेत कुर्डुवाडी येथील मनोज माने यांने उल्लेखनीय कामगिरी करत बाजी मारली यावेळी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते मनोज माने यास रोख रक्कमेसह चांदीची गदा देऊन यांचा गौरविण्यात आले.

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तेर ता. उस्मानाबाद येथील श्री. शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती व शिवछत्रपती तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या कुस्ती स्पर्धांचे दि.७ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कुस्ती स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यांसह परजिल्ह्यातील जवळपास २१६ मल्लांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त संपन्न झालेल्या कुस्ती स्पर्धेत २५ किलो वजनी गटात प्रणव भक्ते , प्रवीण थोरे , आर्यन सोनमाळी , ३० किलो वजनी गटात टिपू जमादार , समर्थ घोडके , श्रीधर क्षीरसागर , ४० किलो वजनी गटात नागेश ठोंबरे , विजय गायके , गणेश भक्ते , ४५ किलो वजनी गटात विजय पवार , शुभम सोनवणे , प्रतिक डोके , ५० किलो वजनी गटात मनिष मोहिते , श्रीवंगम शेगर ,५५ किलो वजनी गटात प्रवीण वडगावकर , ओंकार भारती , प्रेम पवार , ६० किलो वजनी गटात धवलसिंह चव्हाण , अजय गायके , बंटी शेगर , ६२ किलो वजनी गटात सागर शिंदे , अस्लम जमादार , धिरज विधाते , पौढ गट ७० किलो सोमनाथ माने , सुर्यकांत पाटील , राहुल माने , ७८ किलो वजनी गटात निलेश जाधव , विजय ठोंबरे , योगेश साळुंखे , खुल्या वजनी गटात मनोज माने , राहुल शिंदे , प्रदिप काळे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी शिवछत्रपती तालीम संघाचे अध्यक्ष नानासाहेब भक्ते , धनंजय शिंदे ,  सूर्यकांत नाईकवाडी , मलीकबाबा तांबोळी , तानाजी पिंपळे , हरी भक्ते , नवनाथ पसारे , बाबा पवार , पुरुषोत्तम सोमाणी , माऊली कुुंभार ,  नंदू माने , शामराव गायके , निसार कोरबू , करण करणावर , काका राऊत  यांच्या हस्ते विजेत्यां मल्लांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले .यावेळी  उद्धव माने , बालाजी बुरंगे , गोविंद घारगे , नवनाथ पसारे , बालाजी लोंढे , यांनी पंच म्हणून  तर राजेंद्र देवकते यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.

 
Top