वाशी/ प्रतिनिधी-

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे अभ्यास केंद्र वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे पाचवे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ.अनंत पाटील,प्रा.डॉ.आनंद करडे ,प्रा.अशोक पाटील,प्रा.शहाजी चेडे,प्रा.डॉ बालाजी देवकते, प्रा.विश्वास चौधरी, प्रा.रवी चव्हाण, प्रा.अजितकुमार तिकटे, प्रा.राजेश उंदरे, प्रा.अनिता चिंचोलकर, प्रा.छाया नखाते,प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनी उपस्थित होते.


 
Top