उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मेघा इंजिनीरिंग ॲण्ड कंन्स्ट्रक्शन कंपनी कडून करण्यात आलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी गुन्हे अन्वेशन कडून चौकशी करावी, रस्ता बांधताना पाडण्यात आलेल्या घरांना आर्थिक मोबदला देण्यात यावा, सोनपेठ येथील अण्णाभाऊ साठे चौकाची  विटंबना करणाऱ्या माथेफिरूस अटक करावी यासह प्रमुख मागण्यासाठी दि २१ फेबुवारी रोजी सोलापूर - औरंगाबाद महामार्गावर भव्य दिव्य रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष शिवाजी  गायकवाड,राज्य कार्यकारिणी सदस्य रोहित खलसे,जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे, कोअर कमिटी जिल्हाध्यक्ष बालाजी गायकवाड, युवा जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत कांबळे,येरमाळा शहराध्यक्ष सागर कसबे, जिल्हा युवा कार्याध्यक्ष दत्ता साठे,जिल्हा उपाध्यक्ष विजय क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष मारुती क्षीरसागर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थित होती.

 
Top