उमरगा / प्रतिनिधी-

किल्लारी ता. औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाण्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ  पाच वर्षानंतर     शेतकऱ्यांच्या  हस्ते संपन्न झाला.

औसा, निंलगा, उमरगा या तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र  असलेला हा साखर कारखाना जुना असून गेली पाच वर्षे हा कारखाना बंद होता. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने शासन दरबारी हलपाटे घातल्याने कारखान्याला उपजिविका मिळाली आहे.आघाडी सरकारने कारखाना  सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवून कारखान्यावर व्यवस्थापक समिती नियुक्त  केली आहे.कारखाना कार्य स्थळावर गुरूवारी पाच शेतकरी, पाच व्यापारी व पाच कामगारांच्या हस्ते व व्यवस्थापन समितीच्या  उपस्थितीत  अग्नि प्रदीपन  समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य विजयकुमार सोनवणे, बाबा पाटील, संजय पवार , विकास हराळकर रमेश हेळबे, किशोर साठे, महादेव पाटील, विनोद बाबळसुरे, वामनराव पाटील, शिवाजी कदम, शेतकरी नानाराव भोसले, प्रशात पाटील, गुलाब धानुरे, सुभाष भोसले, अशोक देशमुख, व्यापारी शरद भोसले, डॉ. नोगजा, दत्ताजी  भोसले, सुरज बाबळसुरे, अनिल स्वामी, कामगार गोविद काळे, आत्माराम मोहीते, कमलाकर सुर्यवंशी, आर जी पाटील, महेश कुलकर्णी,  चीफ अकाउंटट संतोष वाडीकर, आदी होते, आभार प्रभारी कार्यकारी संचालक तुकाराम पवार यानी मानले.


 
Top