उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वाघोली येथे स्व दिनकर लिंबराज पडवळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था व उमेद च्यावतीने  वाघोली येथे हळदी कुंकू समारंभ पर्यावरण पूरक वृक्ष रोपटी वाटून  मोठ्या उत्साहात संपन्न  झाला.

 यावेळी संस्थेच्या सचिव सौ रुपाली रोहित पडवळ यांनी कार्यक्रम आयोजन करून वृक्ष लागवडी साठी रोपटी वाटण्याच्या संकल्पनेचेअतिशय उत्कृष्ट संकल्पना राबविण्यात आली म्हणून गावकऱ्यांच्या वतीने मोठे कौतूक करण्यात आले त्याच बरोबर उमेद गटाच्या तालुका व्यवस्थापक सौ पूजा घोगरे यांनी महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहित केले यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी महिलांना सर्व तो परी आर्थीक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अभिजीत पडवळ सर यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर गावकऱ्यांच्या वतीने काँग्रेस महिला अध्यक्ष कल्पना ताई मगर यांनी महिला संघटन करण्याचे व उद्योग उभा करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास गावच्या सरपंच सुलभा खडके सोबत चैताली मुकुंद पाटिल, अश्विनी युवराज पाटील, स्वाती मनोहर दाने, प्रज्ञा हनुमंत मगर, समीना शेख, लक्ष्मी मगर , संगीता राऊत , शोभा शिरसागर, मनीषा शिंदे, अनुराधा खडके,  सुवर्णा मगर, ज्योती पाटील, संगिता मगर,  अर्चना मगर, उषा मगर, अश्विनी खडके, अनिता पाटील, उज्वला मते,  सीमा मगर, अर्चना खडके,  मुक्ता खडके, प्रियंका खडके व   जिल्हा युवक काँग्रेस सचिव मुकुंद पाटील, संजय खडके  आदींची उपस्थिती होती. 

 
Top