उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थ्यांनी शासनाच्या महाशरद पोर्टलवर  नाव नोंदणी करावी, असे आवाहन जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी  नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

 दिव्यांग व्यक्तिंनी शासनाच्या या पोर्टलवर नाव नोंदणी केल्यास शासनास मदत आणि सहकार्य करता येते. पोर्टल हे दिव्यांग व्यक्ती, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा आहे. या पोर्टलद्वारे दिव्यांगांना व्यासपीठ मिळवून दिले जात आहे. सर्व प्रकारचे दिव्यांग या पोर्टलवर आपले नांव नोंदवू शकतात.

  दिव्यांग व्यक्ती आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या वर्गणीदारांना एकत्र आणून वर्गणीदारांचे सहकार्य पोर्टलद्वारे मिळविण्यात येत आहेत. पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देणे, विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे, दिव्यांग व्यक्ती, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार यांना एका छताखाली आनण्यात येत आहे. तेंव्हा www.mahasharad.in या संकेत स्थळावर दिव्यांग व्यक्ती, सामाजिक संस्था, देणगीदार कंपन्या यांनी नोंदणी करावी,असेही आवाहन श्री. चौगुले यांनी केले आहे.


 
Top