उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील फकिरा नगर, वैराग नाका या भागात काँग्रेस तर्फे मोफत “ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिर” आयोजित करण्यात आले होते. 

शिबिराचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

दरम्यान सेवा भावनेतून सदर शिबीर घेतल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते महादेव पेठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय राऊत, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, हबीब शेख, अतुल चव्हाण, संतोष पेठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.तीन दिवस चाललेल्या या शिबिरात 150 लोकांची नोंदणी करण्यात आली.              

 
Top