उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या  उपस्थितीत मंत्रालयामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील महावितरणच्या संदर्भात बैठक संपन्न झाली. बैठकीत जिल्हा परिषद तथा राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी  जिल्हा परिषद सर्कल मधील काही विषयांच्या संदर्भात प्राजक्त  तनुपरे  यांच्याकडे मांडणी केली .

यामध्ये सार्वजनिक विहिरीतून मतदारसंघातील गावांमध्ये पाणीपुरवठा होत असताना काही गावे मोठी असल्यामुळे त्या ठिकाणी एक्सप्रेस फिडर बसवण्यात यावे व सिंगल फेज लाईटचा प्रश्न सध्या शेतात राहणाऱ्या लोकांचा महत्त्वाचा असल्यामुळे सिंगल फेज कनेक्शन सुद्धा देण्यात यावेत अशी मागणी सलगर यांनी केली. तसेच मध्यंतरी थकीत बिलांसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले होते .परंतु 50% थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात यावे , ज्या शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर जळतात किंवा त्यांच्या खंड पडतो अशा शेतकऱ्यांच्या संदर्भात ऑईलची व ट्रान्सफर बदलून मिळण्याची लवकर सोय करण्यात यावी. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात ,अशी मागणी सलगर यांनी केली.

 या बैठकीसाठी महावितरण विभागाचे राज्याचे सर्व अधिकारी तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.


 
Top