उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय संजिव ढोबळे यांना नुकतीच युवा सेना विभागीय सचिव या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. अक्षय ढोबळे यांनी मागील पाच वर्षाच्या नगरसेवककाळात अतिशय तळमळीने युवासेनेचे कार्य करीत आले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ना. आदित्य ठाकरे, सुरज चव्हाण, वरुण देसाई,खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ. कैलास पाटील, दुर्गाताई शिंदे,सुभद्राताई फातर्पकर, नितीन सांडगे यांनी युवासेना विभागीय सचिवपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल अक्षय ढोबळे यांचे शिवसैनिक, मि परिवार यांनी अभिनंदन केले आहे.