उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील कडदोरा येथे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने कडदोरा येथे तीन दिवसीय कुकुट पालन प्रशिक्षणाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती मा.सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम चे अध्यक्ष सरपंच सुनंदा रणखांब,प्रमख पाहूणे उमेद तालुका अभियान व्यवस्थापक विवेक पवार कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.विजय जाधव हवामान शास्त्रज्ञ शिवराज रुपनर उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे आदी मान्यवर उपस्थित होते .

डॉ विजय जाधव यांनी कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये मांसल कोंबड्याचे व्यवस्थापन व नियोजन कोंबड्याची संगोपन व वाढ  कोंबड्या तील निरनिराळ्या तानांची प्रभावी व्यवस्थापन तर विवेक पवार यांनी कोंबड्याची विविध आजार, त्यांची लक्षणे व लसीकरण आधी विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर औरादे यांनी केले तर आभार देविदास पावशेरे यांनी मांडले कार्यक्रमाचे नियोजन  प्रदीप बालकुंदे  खंडू बालकुंदे, शरद सास्स्तुरे,भरत रणखांब,प्रशांत चव्हाण वैशाली चव्हाण,बाळु कुंभार आदींनी नियोजन केले.


 
Top