उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील दारफळ येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस सरपंच तथा युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांच्या हस्ते बालकास पल्स  पोलिओची मात्रा देऊन सुरुवात करण्यात आली.दारफळ येथे 0 ते 5 वयोगटातील एकूण 116 बालके आहेत. त्यांच्यासाठी आज आरोग्य उपकेंद्र,दारफळ येथे ही मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. तर जे उपकेंद्राच्या ठिकाणी येऊन मात्रा घेणार नाहीत अशा पालकांच्या घरी जाऊन दिनांक 28/02/2022 व 01/03/2022 रोजी पल्स पोलिओ ची मात्रा देण्यात येणार आहे. 

या प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी प्रजित गायकवाड, आरोग्य सेवक सुलाखे, आरोग्य सेविका जाधव, आशा सेविका सारिका ओव्हाळ, अंगणवाडी सेविका भुतेकर, सुतार, भोयटे, आरोग्य उपकेंद्र कर्मचारी चव्हाण, ग्रामपंचायत सेवक समाधान ओव्हाळ आदींसह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top