उमरगा / प्रतिनिधी-

अमाप धन हे दुखाचे कारण आहे . भौतिक सुखाने मनुष्य अधिक संकटात सापडला आहे . शुद्ध भावनेने देवाची भक्ती केली पाहीजे. संताच्या सान्निध्यात आल्यास दुखापासून मुक्ती मिळून चांगले जीवन जगता येवू शकते  असा संदेश किर्तनातून अचलबेट देवस्थानचे हभप .  हरी महाराज लवटे यांनी दिला . ते त्रिकोळी ता . उमरगा येथील अखंड हरीनाम सप्ताहामध्ये दि.२४  (गुरुवारी ) रोजी किर्तनाचे सहावे पुष्प गुंफताना बोलत होते .

संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 

हेंचि दान देगा देवा ।

तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।

हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ति आणि संपदा ।

संतसंग देई सदा ॥३॥

तुका ह्मणे गर्भवासी ।

सुखें घालावें आह्मांसी ॥४॥

हा अभंग किर्तन सेवेला घेतला होता. पुढे बोलताना लवटे गुरुजी म्हणाले की , लहान मुलाना दुरविचारापासून दुर रहावे . आई वडीलांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत . चांगले संस्कार झालेली मुले समाजापासून कधीच दुर जात नाहीत . संस्कारक्षम पिढी घडविण्यची शक्ती फक्त अध्यात्मातच आहे . त्यामुळे अध्यात्मापासून कोणीही दुर जाऊ नये . 

दि. २५  ऱोजी हभप दिनकर महाराज निकम यांच्या काल्याच्या किर्तन झाले. सप्ताहाची महाप्रसादाने सांगता झाली . या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन , गाथा भजन , नाम स्मरण , प्रवचन , संगीत भजन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . गेल्या ३८ वर्षापासून येथील सप्ताहाची परंपरा चालू आहे .यावेळी तानाजी पाटिल , व्यंकट मुगळे , प्रभाकर बिराजदार, विट्ठल गुरुजी, वसंत बिराजदार, हरी माडजे, मोहन पाटिल , अंकुश भोसले , विश्वनाथ कोडे , महादेव भोसले , शंकराप्पा स्वामी , मोहन वाडीकर , रमेश करनुरे, लक्ष्मण मुरमे , सुभाष पाटिल , खंडू गाडे , गुरु कारागीर ,  यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते . 


 
Top