तुळजापूर  / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उस्मानाबाद  जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा जाहीरनामा हा उपक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून  व मराठवाडा प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष दुर्गश सांळुके  यांनी दिली.

 जिल्हाध्यक्ष  दुर्गेश साळुंके  यांनी माहिती देताना सांगितले की,विद्यार्थी हा राज्यातील महत्वपूर्ण घटक आहे. आजचा सुदृढ विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक बनतो व तो राज्याचा व देशाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ठोस धोरणे व नाविन्यपूर्ण योजना तयार करून आपल्या महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे गरजेचे आहे . हा विचार समोर ठेवून विद्यार्थी सबलीकरणासाठी आवश्यक असणाच्या उपाययोजना, रोजगार आधारित शिक्षणाच्या संकल्पना, राज्यातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला सुलभतेने शिक्षण मिळण्याची प्रक्रिया, त्यासंबंधीच्या योजना अश्या अनेक बाबींवर काम करणे गरजेचे आहे.त्या अनुषंगानेच  आम्ही विद्यार्थ्यांचा स्वतंत्र जाहीरनामा तयार करणार आहोत आणि हा जाहीरनामा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.  या उपक्रमात सहभागी होत विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात सुचना पाठवण्याचे आवाह

 
Top