मुरुम / प्रतिनिधी

उमरगा तालुक्यातील शिवाजी नगर (तांडा), दाळींब येथे संत सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. प्रारंभ मे देवदुत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेस बंजारा सेवा दल उमरगा-लोहारा तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्या तथा देवदुत सामाजिक संस्थेच्या सचिव संगीता, उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, प्रसिध्द गायक प्रा. शंकर चव्हाण, शिवाजी चव्हाण, रतन चव्हाण, बालाजी चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, आजित चव्हाण, नितीन पवार, प्रेम राठोड, रोहितराजे चव्हाण, येशराजे चव्हाण, मंगळबाई चव्हाण, गुराबाई चव्हाण, देवुबाई चव्हाण, कमलाबाई चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.


 
Top