उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद व यवतमाळ हे महाराष्ट्रात सर्वात मागासलेले जिल्हे आहेत. हे जिल्हे दुष्काळग्रस्त तर आहेतच तसेच संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्त्या या दोन जिल्ह्यातच होत आहेत. यवतमाळ जिल्ह्याला आपल्या मंत्री मंडळात स्थान असल्याने थोडी परिस्थिती बरी आहे.औद्योगिक विकासाच्या दृष्टीने त्यातल्या त्यात उस्मानाबाद जिल्हा फारच मागासलेला आहे. साखर कारखाने बहुतेक आजारी व बंद पडलेले आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. ग्रामीण भागातील बहुतेक तरुण, रोजगारासाठी पुणे मुंबईस गेल्याने, खेडी ओस पडली आहेत. उस्मानाबाद जिल्हा हा सिंचनाच्या दृष्टीनेही महाराष्ट्रात सर्वात माघे आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासासाठी जिल्हयाला मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी फोरम ऑफ सिटिझन उस्मानाबाद यांच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

यावेळी एम. डी.देशमुख,धर्मवीर कदम,अब्दुल लतिफ,मुकेश नायगावकर,गणेश रानबा वाघमारे,रंगनाथ भोसले, रमेश बाराते,सहदेव नागमोडे, लक्ष्मणराव धाकतोडे,शेषराव दुधनाळे,पी आर गपाट,नितिन राऊत,प्रमोद चव्हाण अन्य इतर उपस्थित होते.


 
Top