उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हभप बंडू तात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या विषयी अपशब्द काढल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवार दि. ४ फेबुृवारी २०२२ रोजी दुपारी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंडू तात्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडेमारो  आंदोलन करून जोरदार घोषणाबजी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, हभप बंडूतात्या कराडकर यांनी महिला नेत्यांविषयी अपशब्द काढल्याबद्दल महिलावर्गात संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकुमार गवारेे, मनिषा राखुंडे, मंजुषा मगर, नसिमा पठाण, निलेश बारखेडे, मनिषा केंद्रे, स्वाती भातलवंडे, अफसरा पठाण, विक्रम पडवळ, सुनंदा भोसले, प्रिती गायकवाड, दगडू सोनटक्के, राधिका कांबळे, महादेव माळी, जयंत देशमुख, कादरखान, बाबा मुजावर, जोती माळाळे आदींसह राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकत्यांनी बंडू तात्यांचा निषेध केला . त्यानंतर कारवाईच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. 

 
Top