उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय व जिल्हा विधी प्राधिकरण उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार कायदा या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार चे आयोजन केले होते. Webinar साठी प्रमुख पाहुणे  श्री. वसंत यादव, Secretary Legal Services Authority Osmanabad यांनी माहितीचा अधिकार कायदा या विषयावर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की अपील दाखल केल्यानंतर माहिती किती दिवसात दिली पाहिजे, त्याचबरोबर माहिती देण्यास विलंब केला तर त्यासाठी शिक्षा म्हणून किती दंड आकारला जातो तसेच अपील कोणत्या ठिकाणी दाखल करता येते तसेच कोणत्या गोष्टीची माहिती देता येते व कोणत्या गोष्टीची माहिती देता येत नाही याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अध्यक्षीय मनोगत प्रा. डॉ. घोडके यांनी व्यक्त केले.  सदर Webinar साठी मा. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी  मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सकटे यांनी केले तर आभार प्रा. नगरे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेटे मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व राज्यभरातून वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top