तुळजापूर / प्रतिनिधी  -  

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊन त्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात या मागणीसाठी खा. छत्रपती संभाजी महाराज यांनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.२७ रोजी श्री तुळजाभवानी मातेची महाआरती करुन  छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर  एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. दरम्यान, या लाक्षणीक उपोषण आंदोलनाला विविध संघटनांनी सहभाग नोंदवून पाठींबा दिला.

यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले की, मराठा समाजाचा अंत पाहू नका, उद्रेक होण्याआधी सावरून मराठा समाजाला आरक्षण द्या, दिलेली आश्वासने पूर्ण करा, आंदोलन उग्र झाल्यास त्यास ठाकरे सरकार जबाबदार असेल असा स्पष्ट इशारा दिला आहे. 

तसेच खा. छत्रपती संभाजी महाराज यांना सरकारने मराठा आरक्षण व समाजाच्या मागण्या संदर्भात काही आश्वासने दिली होती. मात्र अनेक महिने होऊन देखील त्याची पूर्तता केली जात नसल्यामुळे समाजात नाराजीचा संतापजनक सूर आहे. ठाकरे सरकारची भूमिका चुकीची असून छत्रपती संभाजी महाराज यांची एकही मागणी पूर्ण झालेली नाही. आ. पाटील यांनी केलेल्या आंदोलनामध्ये नगराध्यक्ष सचिन रोचकरी, ऍड अविनाश काळे, चित्तरंजन सरडे, शरद जमदाडे, बाळासाहेब शिंदे, राजेश्वर कदम, शांताराम पेंदे, नेताजी पाटील, सुनील काकडे, विनोद गंगणे, राजसिंह राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, सुरेश कवडे, सभपती रेणुका इंगोले, उपसभापती शिवाजी साठे, अविनाश गंगणे, आनंद कंदले, रामहरी शिंदे, अनिल काळे, संजय पाटील, देवकन्या गाडे, धनंजय वाघमारे, ओम नाईकवाडी, आनंद कंदले, अभिजीत कदम, औदुंबर कदम, शांताराम पेंदे, गुडु कदम आददीसह भाजपा कार्यकते सहभागी झाले होते.

 मध्यवर्ती शिवजयती समितीचे मार्गदर्शक प्रकाश जगताप, नंदकुमार गवारे, खंडू राऊत यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.  मुस्लिम समाज, ब्राह्मण समाज, लिंगायत समाज, भारतीय मराठा महासंघ, महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटना, तुळजाभवानी पुजारी मंडळ, वडार संघटना, तुळजापूर तालुका पेट्रोल पंप संघटना व एसटी कर्मचारी संघटना आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला.

 
Top