तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मंदीराचे मुख्यगर्भगृह पुरातत्व खात्याचा मान्यतेनंतर सोन्याच्या पातळ पञ्याने मढविण्याचा मानस व्यक्त करुन तिर्थक्षेञ जेजुरीच्या धर्तीवर तिर्थक्षेञ तुळजापूरचा  विकास करण्याचे नियोजन असल्याची माहीती  श्री तुळजाभवानी मंदीराचे विश्वस्त तथा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पञकार परिषद घेवुन दिली.

यावेळी पुढे बोलताना पाटील पुढे म्हणाले की, तिर्थक्षेञ तुळजापूरचा विकासासाठी ऐतिहासिक निर्णय घ्यावे लागणार आहेत . त्या  अनुषंगाने आम्ही वाटचाल करीत आहोत. श्री तुळजाभवानी मंदीर परिसराचा विकास विचार विनिमय करुन योग्य सल्लागार नेमुन  सर्वांची मते  विचारात घेवुन  योग्य व्यवस्थापन व  दिर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करुन विकास आराखडा तयार केला जाणार आहे. हे काम करताना  पुरातत्व विभागाचा मान्यता घेतली जाणार आहे.  यासाठी राज्याचे पुरातत्व विभाग प्रमुख डाँ तेजेस गर्ग यांच्या नेतृत्वाखाली पथक येवुन पाहणी केल्यानंतर त्यांनी दिलेल्या अहवाल,नंतर यास मुर्तु स्वरुप आणले जाणार आहे.या वेळी विनोद गंगणे , सचिन पाटील, संतोष बोबडे, विजय शिंगाडे, अविनाश गंगण,  गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले आदी उपस्थितीत होते.


 
Top