उस्मानाबाद(प्रतिनिधी)

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.यावेळी छञपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचा विद्यार्थी भैरवनाथ माकोडे “छञपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य “या विषयावर मनोगत व्यक्त करतांना म्हणाला की,छञपती शिवाजी महाराघांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकञ करून स्वराज्य निर्मान केले व रयतेची काळजी घेतली शेतक—यांचा,महिलांचा,गोर,गरिबांची काळजी महाराजांनी घेतली त्यांचा वारसा फुले,शाहू,आंबेडकरांनी चालवला म्हणूनच महाराषट्राला पुरोगामी म्हणून ओळखले जाते आज महाराजांचे नाव घेवून राजकारण केले जाते त्यांचे पुतळे बांधायची स्पर्धा लागली आहे माञ ज्या छञपतींनी आपल्या राज्याला अनेक किल्ले दिले त्याचे संवर्धन माञ होत नाही.महाराजांचे विचार आत्मसात करून आचरण करण्याची आज गरज आहे.

यावेळी प्रा.वैभव आगळे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,छञपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे अनेक पैलू आहेत ते आजच्या शिक्षकांनी समजून घेतले पाहिजेत व त्यांचे विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहचवले पाहिजेत व सक्षम विद्यार्थी घडवले पाहिजेत यावेळी उपप्राचार्य प्रा. बबन सूर्यवंशी,प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके उपस्थित होते.यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूञसंचालन प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी केले

 
Top