तुळजापूर / प्रतिनिधी-

 आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला. यात १०२ तक्रारी करण्यात आल्या असून, प्राधान्याने अतिक्रमणं, साफसफाई आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारी होत्या.

नगरपालिकेच्या कार्यालयात मंगळवारी पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर जनता दरबाराचे आयोजन केले होते. प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, मंदीर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्यासह माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी युवा नेते विनोद गंगणे, चंद्रकांत कणे, पंडितराव जगदाळे, किशोर साठे, आनंद कंदले आदींची उपस्थिती होती. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या मध्ये पुजारी बांधव, व्यावसायिकांसह ज्येष्ठ नागरिक, सामान्य जनता कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, ऐन वेळी जनता दरबार नगराध्यक्षांच्या दालनात हलवल्याने सामान्य नागरिकांना बाहेर वेटिंग वर थांबावे लागले. राजकीय पुढारी, नेते मंडळीनी थेट घुसखोरी केली होती. 

 
Top