तुळजापूर/ प्रतिनिधी-

कोरोना पार्श्वभूमीवर भाविकांनसाठी बंद करण्यात आलेले श्रीतुळजाभवानी मंदीरातील अतिप्राचीन,असे श्रीकल्लोळ तिर्थकुंड नऊ महिन्या नंतर भाविकांना स्नान व हातपाय धुण्यासाठी खुले केल्याने भाविकांन मधुन समाधान व्यक्त होत आहे.

श्री तुळजाभवानी मंदीरातील श्रीकल्लोळ तिर्थकुंडात स्नान करुन किंवा  हातपाय धुवुन देवीदर्नशनार्थ जाण्याची परंपरा असल्याने श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान ने श्रीकल्लोळ तिर्थकुंड भाविकांनसाठी खुले केल्याने भाविकांनमधुन समाधान व्यक्त होत असुन या निर्णयामुळे श्रीगोमुख तिर्थकुंडा येेथे होणारी गर्दी आता कमी होणार आहे.

 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर  भाविकांनसाठी ५/४/२०२१ रोजी प्रवेश बंद करण्यात आले होते ते श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवाचा प्रथम दिनी घटस्थापने दिनी भाविकांनासाठी खुले करण्यात आले. माञ मंदीरातील पविञ, असे श्रीकल्लोळ तिर्थ  कुंड भाविकांनसाठी बंद च होते अखेर ते मंगळवार दि.१ रोजी खुले केल्याने भाविकांंनमधुन समाधान व्यक्त होत असुन भाविक आता या पवित्र तिर्थकुंडात स्नान करुन देवीदर्नशनार्थ मंदीरात जात आहेत.

 
Top