उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या मूर्तीचे पूजन प्रमुख जिल्हा न्यायाधीश  पेठकर साहेब व अध्यक्ष नितीन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

 यानंतर भव्य शिव रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करण्यात आले.

 यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शाहीर बंडू खराटे यांचा शाहिरी शिवदर्शनचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कु आरोही भाग्यवंत पवार हिने शिवरायांच्या  जीवनावर माहिती दिली. यावेळी बार कॉउन्सिल सदस्य मिलिंद पाटील,पदाधिकारी वरिष्ठ विधिज्ञ, महिला विधीज्ञ, जूनियर्स तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

 
Top