परंडा / प्रतिनिधी- 

 मराठवाड्यातील सर्व शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे शिक्षक दरबार कार्यक्रमात केले.

 यावेळी व्यासपीठावर , महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे , भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी येथील प्राचार्य पाटील, वैराग येथील प्राचार्य राजमाने ,बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक बिबीशन रोडगे व या महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते.

 यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ उद्दिष्ट विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परांडा शहरातील अनेक प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी प्रास्ताविक  करताना प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी सांगितले की  शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व वसंतराव काळे होते.आणि त्यांचाच वारसाहक्क आमदार विक्रम काळे यांनी चालवला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.संपूर्ण आयुष्य केवळ बहुजन समाजाच्या प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांच्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे .

पुढे बोलताना  आमदार विक्रम काळे म्हणाले की पेन्शन चा विषय असो विनाअनुदानित चा विषय असो महाविद्यालयातील सोयी-सुविधांचा विषय असो या सर्व विषयांचा शेवट केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही .या महाविद्यालयात 25 हजार रुपयांच्या पुस्तकांची भेट देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले .या महाविद्यालयाचा गुणवत्तापूर्वक विकास पाहता त्यांनी भरभरून कौतुक केले .सात वर्षाच्या कार्यकालामध्ये प्राचार्या डॉ दीपा साबळे मॅडम यांनी महाविद्यालयाची उंची विद्यापीठाच्या अंतर्गत प्रामाणिकपणे उंचावली आहे . महाविद्यालयाचा शैक्षणिक व संशोधन क्षेत्रामध्ये कायापालट केला आहे.संपूर्ण आयुष्य त्यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये  घातले आहे .या महाविद्यालयाला शिस्त लावली आहे .या महाविद्यालयातून अनेक संशोधक तयार झाले आहेत, अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या पदावर गेले आहेत तेव्हा ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .यावेळी प्राचार्य पदाचा कार्यकाल 65 वर्षे करण्यासाठी चे निवेदन याठिकाणी देण्यात आले.वेगवेगळ्या मागण्या चे निवेदन या ठिकाणी वेगवेगळ्या समित्या द्वारे देण्यात आले त्यांनी ते स्वीकारले व त्याची अंमलबजावणी करू असे  आश्वासन दिले . शिक्षक दरबार या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे आणि आई क्यू ए सी चेअरमन डॉ महेशकुमार माने यांनी केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख  डॉ विद्याधर नलवडे ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी अनेक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली मते आमदार विक्रम काळे यांच्या समोर मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले.


 
Top