तुळजापूर/ प्रतिनिधी- 

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला पुणे येथील देविभक्त  मुकुंद यशवंत देशमुख  यांनी   दोन लाख  रुपये रोख देणगी दिली आहे.

 यानिमित्ताने मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांनी श्री देवीची प्रतिमा व साडी , फोटो, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मंदिर कर्मचारी विश्वास कदम, विश्वास सातपुते, गणेश नाईकवाडी, संकेत वाघे, मार्तंड दीक्षित, सुरक्षा रक्षक व पुजारी जगदीश पाटील उपस्थित होते. 


 
Top